आलापल्ली व अहेरी शहरात २८ सप्टेंबर ते ४ आक्टोबर पर्यंत जनता कर्फ्यु

संतोष अग्रवाल- कार्यकारी संपादक

    कोरोनाचा वाढ़त्या प्रभावामुडे  आलापल्ली व अहेरी शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांची एक बैठक काल संध्याकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत  आलापल्ली व अहेरी शहरात सोमवार ते रविवार ( 28 सप्टेंबर ते 4 आक्टोबर ) ७ दिवसा पर्यन्त कडकडीत बंद ठेवण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे.
व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येऊन चर्चा करून ह्या कडकडीत बंदच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. 
       त्यानंतर या निर्णयाची माहिती तहसीलदार,अहेरी, मुख्याधिकारी आणि पोलिस निरीक्षक,अहेरी यांना देण्यात आले. कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस दक्षिण गडचिरोलीतही अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने व्यापारी बांधवानी हे पाऊल उचलले आहे. तेव्हा सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हाहन अहेरी व आलापल्ली व्यापारी संघाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.