आलापल्ली व अहेरी येथील जनता कर्फ्युला व्यापारी संघटनाकडुन उत्तम प्रतिसाद
सेवा वाकडॊतपवार- उपसंपादक
गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्यांतील आलापल्ली व अहेरी या ठिकाणी व्यापारी संघटना कडुन सात दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आले आहे. कोविड 19 चा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन व्यापारी संघटना आक्रमक झाले आहे. आलापल्ली व अहेरी हे मुख्य बाजारपेठ असून या बाजारपेठेतुन इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवाचा पुरवठा होतो. त्यामुळे आलापल्ली व अहेरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणांत नागरिक ये-जा करतात. व्यापारी संघटनांनी हे लक्षात घेऊन कोविड 19 चा प्रभाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यु लावण्यात आले आणि अत्यावश्यक सेवा वगळुन सर्व बाजारपेठ बंद करण्यात आले. नागरिकांनी जनता कर्फ्युला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला दिसून येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा