गडचिरोली जिल्हा परिषदचे सदस्य श्री. विनोद लेनगुरे यांनी छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गावांना दिली भेट

सेवा पवार : - उपसंपादक

मौजा कनेली, चुटीनटोला, समलपुर, बोटेहुर, आलकन्हार, या गावांचा दौरा करून स्थानिक कर्मचाऱ्यां समक्ष विविध समस्यांचा व विकास कामांचा घेतला आढावा.

    धानोरा तालुक्यातील गट्टा-पेंढरी  जिल्हा परिषद क्षेत्रातील महाराष्ट्र राज्याचे अगदी शेवटच्या टोकावर असलेले ही अतिशय दुर्गम असून विकासापासून कोसो दूर आहेत. त्या ठिकाणी येणं-जाण्याकरीता रस्ता नाही. छोट्या छोट्या नाल्यावर पुल नाही, त्यामुळे पावसाच्या काळामध्ये त्यांचा संपर्क तुटतो. गरोदर माता व आजारी असणाऱ्या व्यक्तीला उपचारा अभावी आपला प्राण गमवावे लागतो. अश्या प्रकारे सर्व गावकऱ्यांनी समस्या मांडले.
  तसेच या दुर्गम भागामध्ये  अतिक्रमण धारक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून, त्यांना वन पट्टे अजून पर्यंत मिळालेले नाही. परिणामी त्यांना शासनाच्या विविध योजना पासून वंचित राहावे लागत आहे. बऱ्याचशा लोकांकडे आधार कार्ड, राशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र व इतर महसुली पुरावे नसल्याने त्यांना वन पट्टे मिळण्यास अडचण होत आहे, म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य श्री विनोद लेनगुरे व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री निवास दुल्लमवार यांनी मौजा कनेली येथे चार गावातील नागरिकांना, स्थानिक कर्मचारी- तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, आरोग्य सेवक यांना बोलावून परिस्थितीची जाणीव करून दिली व वेळोवेळी जनतेला मार्गदर्शन व सहकार्य करावे असे सांगण्यात आले. 
     या गावांमध्ये पिण्याचे पाण्याचे विहीर नाही, बोरवेल दुरुस्तीची गाडी बोरवेल पर्यंत जात नसल्याने बोअरवेल ना दुरुस्त आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना गडूळ पाणी प्यावे लागत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री विनोद लेनगुरे व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री निवास दुल्लमवार यांनी सदर समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.
   यावेळी माजी सरपंच बाबुरावजी गेडाम, संजय गावडे, सुरेश उसेंडी, जगदीश मतलामी, श्याम आतला, केशव गावडे, जुदू गावडे, हिरामण एक्का, मिनुराम उसेंडी, मनिराम  गावडे, रालू कुमोटी, धनिराम गावडे, रतन एक्का, रावजी बोगा, सैनु बोगा, ग्रामसेवक वडालकोंडा, तलाठी काटेंगे, वनरक्षक आत्राम यांच्या समक्ष चार गावातील शेकडो महीला-पुरुष वर्ग उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.