डिजिटल शेतीशाळा :हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT)

गडचिरोली, (जिमाका) दि. १६ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० प्रकल्प अंतर्गत गडचिरोली जिल्हाची निवड झाली असून या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश बदलत्या हवामानाशी जूळउन घेण्यासाठी शेतकऱ्यांना तसेच भूमिहीन कुटुंबाना सक्षम करणे व कृषी आधारित उपजीविकेचे साधने उपलब्ध करून शेती किफायतशीर करणे हा आहे.बदलत्या हवमानाचा शेतीला कमीत कमी फटका बसेल यासाठी डिजिटल शेतीशाळेचे गावनिहाय नियोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने प्रकल्पा अंतर्गत डिजिटल शेतीशाळा अभियान स्वरूपात राबविण्यात आले त्यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) विषयक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशनद्वारे संचलित “डिजिटल शेतीशाळा” हे एक ऑनलाईन व्यासपीठा द्वारे तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीकनिहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम (Zoom) आणि यूट्यूब (YouTube) च्या माध्यमातून दिले गेले.

 सदर शेती शाळा मध्ये पुढील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

• भाग -३ एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटक, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर.

उपरोक्त शेतीशाळा नियोजित दिनांक १५ एप्रिल २०२६ दिवशी सायंकाळी. ७.३० वाजता सुरू करण्यात आली . या डिजिटल शेतीशाळा आपल्या गावात कृषी विभाग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० प्रकल्प अंतर्गत मार्फत राबविल्या गेल्या. सदर डिजिटल शेतीशाळा जिल्हातील आयोजित गावात करण्यात आले व त्यामध्ये शेतकरी ,महिला बचत गट सदस्य ,महिला शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनीतील सदस्य यांनी उपस्थित राहून शेतीशाळेतील तज्ञा मार्फत तंत्रज्ञानाचा, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटक, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर व त्यांचे महत्व या विषयी मार्गदर्शन करण्यात आले .शेती विषयक निर्माण होणाऱ्या समस्याचे चर्चेच्या माध्यमातून तज्ञाच्या मार्गदर्शनातून निरासरण करण्यात आले सर्व जिल्हातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी .मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी व समूह सहायक,तंत्रज्ञान समन्वयक यांचे मार्फत गावा गावात घेण्यात आले. या डिजिटल शेतीशाळेचा खरीप हंगामा मध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटक, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर. इत्यादीचा फायदा गडचिरोली जिल्हातील शेतकऱ्यांना होईल.

पुढील नियोजित डिजिटल शेतीशाळा

भाग -४ भात शेतीचे लागवड तंत्रः भाताची थेट पेरणी (DSR), श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत.

 नियोजित दिनांक : २२ एप्रिल, २०२६

सदर शेतीशाळा साठी जिल्हातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थिती राहावे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली, प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.