कलम ३६ अन्वये मनाई आदेश जाहिर

गडचिरोली, (जिमाका) दि.०९ : आगामी काळात गडचिरोली जिल्हयात दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्याअर्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत पार पडावे याकरीता गडचिरोली जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.

 प्र.पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम रमेश यांना महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३६ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढे नमुद केल्या प्रमाणे लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करीत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणूकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दरम्यान धार्मिक पुजा, स्थानाच्या जवळ लोकांचे वागणूकीबाबत निर्बंध घालण्याचे अधिकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या ठिकाणी बाधा होणार याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणूकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दरम्यान रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणे, ढोल ताशे वाजविणे इ निर्बंध घालण्याचे अधिकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दरम्यान सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दरम्यान सार्वजनिक ठिकाणी / रस्त्यावर लाऊड स्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, कलम ३३,३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ मुंबई पोलीस अधिनियमान्वये काढण्यात आलेला आदेशाची अमंलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार

हा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्हा कार्यक्षेत्रात दिनांक १४ एप्रिल २०२६ चे ००.०१ वा. पासून ते दिनांक १५ एप्रिल २०२६ चे २४.०० वा. पर्यंत लागू राहील.

या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३४ प्रमाणे कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील. सदरचा आदेश दिनांक ०९ एप्रिल २०२६ रोजी प्र.पोलीस अधिक्षक, गडचिरोली, एम रमेश यांच्या सही शिक्क्यानिशी जारी केलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.