२६ एप्रिल रोजी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक आयोजित
गडचिरोली, (जिमाका) दि.१६ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-२०२६ करीता मतदान दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यत, मतदान केंद्र क्रमांक १/१- गडचिरोली, जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जुने शल्य चिकित्सक कक्षाजवळ, तळमजला, कॉम्पलेक्स, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे होणार आहे. याकरिता पात्र मतदारांनी त्यांचेकडे असलेले महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे ओळखपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदानाकरीता येतांना ओळख पटविण्याकरीता सोबत आणने अनिवार्य आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाकरीता उपरोक्त मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा