अक्षयतृतीयाला बालविवाह केल्यास कठोर कार्यवाही
गडचिरोली, (जिमाका) दि.१७: अक्षयतृतीयेच्या मुहर्तावर दरवर्षी बालविवाह पार पडतात हे बालविवाह लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि महीला व बालविकास विभाग अॅक्शन मोडवर आले आहे. या दिवशी बालविवाह झाल्यास थेट कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिलेल्या आहेत.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सीडीपीओवर जवाबदारी-
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अँक्शन प्लॅन तयार केला आहे यात ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. तर शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पंडित, छायाचित्रकारावर होणार कार्यवाही-
बालविवाहात सहभागी होणारे व सहकार्य करणारे व्यक्ती, धार्मिक गुरु, पंडित सेवा देणारे व्यवसायिक मंडप, मालक, फोटोग्राफर केटरिंग व्यवसायिक, लॉन्स मालक अणि वाजंत्री यांच्यावरही करयदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहेत.
शुभ मुहुर्ताचा गैर फायदा-
अक्षयतृतीया हा सण साडेतीन शुभ मुहुर्तापैकी एक मानला जातो यामुळे हा शुभ मुहुर्त लक्षात घेता या शुभ मुहुर्तावर विवाह विधी केल्या जातात. या मुहुर्ता जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
बालविवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक-
नागरिकांना बालविवाह रोखण्यासाठी चाईल्ड हेल्प लाईन टोल फ्री क्रमांक १०९८ अथवा ११२ यावर माहिती नोंदविता येणार आहे व ही माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.
गडचिरोली जिल्हयात १७ बालविवाह थांबविण्यात आलेत-
मागील सहा वर्षात राज्यात प्रशासनाने ५ हजार ४२१ बालविवाह थांबविण्यात आलेत ४०१ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व जिल्हा महिला व बालविकास कार्यालया अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांनी जिल्हयात १७ बालविवाह थांबविण्यात आलेत व बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम १६ (१) नुसार कार्यवाही करण्यात आली आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा