उन्हाळयात उष्माघाताने होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी कामगार अधिकारी यांचे सूचना

गडचिरोली, (जिमाका) दि.०९ : गडचिरोली जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढत असून, उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. येत्या उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि उष्मघातामुळे होणारे मृत्यु टाळण्यासाळी प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर उन्हात काम करणाऱ्या कामगारांना उष्माघाताचा (Heat Wave) धोका निर्माण होऊ नये, यासाठी सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली तर्फे सर्व मालक, कंत्राटदार आणि कामगारांना खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बांधकाम कामगार, विटभट्टी कामगार, रोजंदारी कामगार मजूर व सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी महत्त्वाच्या 

सूचना :- 

१. कामाच्या वेळेत बदल : शक्य असल्यास कामाच्या वेळा अशा प्रकारे नियोजित कराव्यात की, दुपारी १२ ते ४ या सर्वाधिक उष्णतेच्या काळात उन्हात काम करणे टाळता येईल.

२. पाण्याचे सेवन : तहान लागलेली नसली तरीही थोड्या थोड्या वेळाने पुरेसे पाणी प्यावे. कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय मालकांनी करणे बंधनकारक आहे.

३. पेहराव : बाहेर काम करताना हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, टॉवेल किंवा छत्रीचा वापर करावा.

४. विश्रांती : कामाच्या दरम्यान काही वेळ सावलीत विश्रांती घ्यावी. कामाच्या ठिकाणी सावलीसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय असावी.

५. खाद्यपदार्थ : कामावर येताना घरून निघताना भरपूर पाणी पिऊन आणि शक्यतो हलका आहार घेऊन निघावे. ओआरएस (ORS), लिंबू सरबत, ताक यांचा वापर करावा.

मालक आणि कंत्राटदारांसाठी सूचना:

१. कामाच्या ठिकाणी प्रथमोपचार पेटी (First Aid Kit) आणि उष्माघातावर उपचारासाठी आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत.

२. एखाद्या कामगाराला चक्कर येणे, मळमळणे किंवा जास्त ताप आल्यास त्याला त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवावे.

करिता उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता सर्व कामगारांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली, कुलदिप प्र. भोलाने यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.