पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
गडचिरोली, (जिमाका) दि.०२: Guardians Training Academy Hyderabad Pvt Ltd., जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन टप्प्यामध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे. पहिला टप्पा पार पडला असून दूस-या टप्प्याकरीता दिनांक ०६ एप्रिल २०२६ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत वेळ स.११.०० ते दू.४.०० वाजेपर्यंत भरती मेळावा चामोर्शी, मुलचेरा, आलापल्ली (एटापल्ली), अहेरी, भामरागड , सिरोंचा व गडचिरोली तालुक्यामध्ये नियोजित आहे. सदर रोजगार मेळावे तारखानूसार तालुकानिहाय तालुक्यातील पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये Guardians Training Academy Hyderabad Pvt Ltd या संस्थेकडून Security Guard व Security Supervisor या पदांकरीता उमेदवारांचे प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सदर पदांचे वेतन रू.१८०००/- ते रू . ३००००/- पर्यंत राहणार आहे. करिता सदर पदांकरीता १९ ते ४५ वयोगटातील ईच्छूक असलेले गडचिरोली जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र, ( १० वी पास /नापास, १२ वी, पदवी पदविधर ) गुणपत्रक, आधार कार्ड,मतदान ओळखपत्र, बॅक पासबुक ( मुळ व झेराक्स ), पोलीस व्हेरीफीकेशन, फोटो -६, डॉक्टर कडून मेडीकल फिटनेस प्रमाणपत्र इत्यादी सह स्व:खर्चाने वेळ स.११.०० ते दू.४.०० वाजेपर्यंत खालील नियोजित तारखानूसार दिलेल्या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-२ युनिट क्रं-२,कॉम्प्लेक्स,गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क साधावा. दुरध्वनी क्र.०७१३२-२२२३६८ असा आहे.
रोजगार मेळाव्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
दूसरा टप्पा :
अ.क्र दिनांक तालुका मेळाव्याचे ठिकाण मेळाव्याची वेळ
१. ०६/०४/२०२६ चामोर्शी पंचायत समिती,सभागृह, चामोर्शी
सकाळी ११.०० ते
सायंकाळी ४.००
२. ०७/०४/२०२६ मुलचेरा पंचायत समिती,सभागृह , मुलचेरा
३. ०८/०४/२०२६ आलापल्ली(एटापल्ली) पंचायत समिती,सभागृह, आलापल्ली ( एटापल्ली)
४. ०९/०४/२०२६ अहेरी पंचायत समिती,सभागृह, अहेरी
५. १०/०४/२०२६ भामरागड पंचायत समिती,सभागृह , भामरागड
६. १३/०४/२०२६ सिरोंचा पंचायत समिती,सभागृह , सिरोंचा
७. १५/०४/२०२६ गडचिरोली पंचायत समिती,सभागृह , गडचिरोली
पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राईव्ह ( आर्मी भरती ) पंचायत समिती,सभागृह, चामोर्शी, वेळ -सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा