थ्रोबॉल या क्रीडा प्रकाराच्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा आयोजन

गडचिरोली, (जिमाका) दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सत्र २०२५-२६ या वर्षात विविध स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते.

थ्रोबॉल या क्रीडा प्रकाराच्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा (१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली) दि. २० ते २१ मार्च, २०२६ रोजी सकाळी ०८.०० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे करण्यात येणार आहे. त्याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील इक्छुक शाळा/महाविद्यालयातील खेळाडूंनी स्पर्धेत सह्भागाकरीता दि. १८ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज भरून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नोंदणी करावी असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.