जिल्ह्यात १४ मार्च रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' नागरिकांच्या महसुली समस्यांचे एकाच छताखाली निराकरण

गडचिरोली,(जिमाका)दि.१३: महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विषयक तक्रारी व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी शासनातर्फे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शनिवारी, १४ मार्च २०२६ रोजी मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा,
 असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

येत्या १४ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांमध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बाम्हणी (ता. गडचिरोली), पेरमिल्ली (ता. अहेरी), येणापूर (ता. चामोर्शी), देऊळगाव (ता. आरमोरी), मालेवाडा (ता. कुरखेडा), बेळगाव (ता. कोरची), पेंटीपाका (ता. सिरोंचा), ताडगाव (ता. भामरागड), सुरसुंडी (ता. धानोरा) व कोटमी (ता. एटापल्ली) या महसूल मंडळांचा समावेश आहे. त्यानंतरही १० एप्रिल, १७ एप्रिल, २४ एप्रिल, ८ मे, १५ मे या नियोजित तारखांना महसूल मंडळनिहाय ठिकठिकाणी या शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.

  या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १४ मार्च रोजी आयोजित या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात उपस्थित राहून आपल्या महसुली समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.