जिल्हयातील सर्व जिल्हा पशुचिकित्सालय, तालुका पशुचिकित्सालय, पशुवैद्यकीय चिकित्सालय व फिरते पशुचिकित्सालय यांचे कामकाजाच्या सुधारीत वेळा जाहिर
गडचिरोली, (जिमाका) दि. १३ : राज्यातील सर्व जिल्हा पशुचिकित्सालय, तालुका पशुचिकित्सालय, पशुवैद्यकीय चिकित्सालय (स्थानीक) व फिरते पशुचिकित्सालय यांचे कामकाजाचे वेळा निश्चित करणेबाबत विभागाकडुन शासन निर्णय दिनांकक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित झाले,
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडुन कृत्रिम रेतन, कृत्रिम रेतनाव्दारे जंन्मलेली वासरे, गर्भधारणा तपासणी , वंधत्व निवारण उपचार , लसीकरण , औषधेपचार व शस्त्रक्रिया या सारख्या तांत्रिक सेवा पुरविण्यात येतात. राज्याच्या पशुजन्य उत्पादनात वाढ घडवुन आणण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची वाटचाल पशुउदयोजकतेकडे करणे आवश्यक असुन त्या माध्यमातुन रोजगार निर्मीती व स्वंय रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे. योजना व कार्यक्रमाचे माध्यमातुन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रात रोजगार निर्मीती व स्वंय रोजगार या साठी प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमाचे माध्यमातुन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रात उदयोजकता निर्माण करुन शेतकरी व पशुपालाकांचे उत्पन्न वाढविण्याचे उदिष्टे साध्य होईल, यासाठी राज्यातील पशुधनास पशुवैद्यकीय दवाखाने / चिकीत्सालयांच्या माध्यमातुन देण्यात येणा-या पशुवैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध होणे आवश्यक ठरते. या पार्श्वभुमीवर पशुवैद्यकीय संस्थाच्या कामकाजाच्या वेळा निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्यानुसार जिल्हयातील सर्व जिल्हा पशुचिकित्सालय, तालुका पशुचिकित्सालय, पशुवैद्यकीय चिकित्सालय व फिरते पशुचिकित्सालय यांचे कामकाजाच्या सुधारीत वेळा सोमवार ते शुक्रवार सकाळी ८.०० ते १.३० व सांयकाळी ३.०० ते ५.०० वाजेपर्यत व शनिवारला सकाळी ८.०० ते १.०० या वेळा निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हा स्तरावरावरील व तालुका सतरावर विशेषज्ञ सेवा तसेच पशुपालांना आकस्मीक प्रसंगी २४ तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. असे जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा