जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी व शिक्षण विभागातील विविध योजनांची माहिती व सुचना देणेबाबत दिनांक 22 मे रोजी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन.
गडचिरोली,दि.19: तालुका स्तरावर इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेत तसेच सी. ई.टी,नीट,जे.ई.ई. व्दारे व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करताना बऱ्याच अडचणी येत असून व बरेची अर्जदार त्रृटीयुक्त प्रकरणे सादर करत असल्याने याबाबत तालुका स्तरावरील जात वैधता प्रमाणपत्राबाबत प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात येत आहे. प्रशिक्षण शिबीर स्थळ/महाविद्यालयाचे नाव:- सेंट. फ्रान्सिस हायस्कूल,नागेपल्ली,ता.अहेरी दिनांक 22.04.2022 वेळ सकाळी 11.00 वाजता सिरोंचा,एटापल्ली,भामरागड,अहेरी व मुलचेरा या तालुक्यातील कनिष्ट महाविद्यालयातील मुख्याध्यापक, लिपीक तसेच अर्जदार व पालक यांनी सदर प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा. तसेच सन-2021-22 या सत्रात समितीकडे जात वैधता प्रमाणपत्राचा प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु आज पावेतो जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही,असे प्रस्ताव त्रृटीमध्ये आहेत.अशा या पाच तालुक्यातील अर्जदारांनी सदर प्रशिक्षण स्थळी सर्व मुळ पुरावे व मानीव दिनांकाचा जात व अधिवास पुराव्यासह उपस्थित राहावे असे आवाहन उपायुक्त दे.ना. धारगावे या...