25 एप्रिल रोजी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन.

गडचिरोलीदि.08समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येते.

दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय,कुरखेडा येथे तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केलेला आहे. तरी समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी लेखी अर्ज/तक्रारीसह तहसिल कार्यालय कुरखेडा, येथे उपस्थित रहावे, असे तहसिलदार तथा अध्यक्ष तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन समिती,कुरखेडा सोमनाथ माळी यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.