पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली, (जिमाका) दि.०२: Guardians Training Academy Hyderabad Pvt Ltd., जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन टप्प्यामध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे. पहिला टप्पा पार पडला असून दूस-या टप्प्याकरीता दिनांक ०६ एप्रिल २०२६ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत वेळ स.११.०० ते दू.४.०० वाजेपर्यंत भरती मेळावा चामोर्शी, मुलचेरा, आलापल्ली (एटापल्ली), अहेरी, भामरागड , सिरोंचा व गडचिरोली तालुक्यामध्ये नियोजित आहे. सदर रोजगार मेळावे तारखानूसार तालुकानिहाय तालुक्यातील पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये Guardians Training Academy Hyderabad Pvt Ltd या संस्थेकडून Security Guard व Security Supervisor या पदांकरीता उमेदवारांचे प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सदर पदांचे वेतन रू.१८०००/- ते रू . ३००००/- पर्यंत राहणार आहे. करिता सदर पदांकरीता १९ ते ४५ वयोगटातील ईच्छूक असलेले गडचिरोली जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणि...