सामान्य रुग्णालय येथे “We Care, We Cure” या थीम अंतर्गत गर्भाशय मुखाच्या कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.
गडचिरोली, (जिमाका) दि.28 : 27 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे “We Care, We Cure” या थीम अंतर्गत गर्भाशय मुखाच्या कर्करोग (Cervical Cancer) जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वर्षा लहाडे (जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली तथा HPV Vaccination, Cervical & Breast Cancer, Committee Chairperson IMA State) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याबाबत विशेष जनजागृती करण्यात आली. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे, कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच HPV लसीकरण याबाबत सविस्तर माहिती उपस्थित मान्यवरांमार्फत देण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, गर्भाशय मुखाचा कर्करोग हा लवकर निदान व योग्य उपचारांद्वारे पूर्णपणे बरा होऊ शकतो. या कार्यक्रमांतर्गत VIA positive महिलांवर कर्करोग होण्यापूर्वीच उपचार केले जाणार आहेत.
सदर कार्यक्रमास उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा अंतर्गत, कक्ष प्रमुख सहायता निधी OSD मंगेश चिवटे, डॉ. शशीकांत शंभरकर (उपसंचालक, नागपूर विभाग), अध्यक्ष All India medical association महाराष्ट्र डॉ. संतोष कुलकर्णी, सहअध्यक्ष we care and cure Program ज्योती सुळ, डॉ. विक्रांत देसाई (सेक्रेटरी IMA) यांच्या ऑनलाईन उपस्थितीत तसेच डॉ. छाया उईके (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. प्रवीण किलनाके, (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चामोर्शी तथा अध्यक्ष IMA जिल्हा गडचिरोली), डॉ. बागराज धुर्वे (निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. प्रशांत पेंदाम (बालरोग तज्ञ वर्ग १), डॉ. प्रशांत आखाडे (स्त्रीरोग तज्ञ वर्ग १), डॉ. अमित साळवे, (अति. जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. आशिष भांगे (रे.ऑन्कोलॉजिस्ट), डॉ. उज्ज्वला बोरकर (स्त्रीरोगतज्ञ), इतर अधिकारी व कर्मचारी, प्रशिक्षणार्थी तसेच महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली तथा HPV Vaccination, Cervical & Breast Cancer, Committee Chairperson IMA State यांनी “We Care, We Cure” ही संकल्पना प्रत्येक रुग्णाला संवेदनशील, गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर आरोग्यसेवा देण्याची आपली वचनबद्धता दर्शविते, असे नमूद केले. डॉ. मंजुषा गिरी यांनी सांगितले की, गर्भाशय मुखाचा कर्करोग हा योग्य वेळी निदान झाल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. महिलांनी लाज किंवा भीती न बाळगता नियमित तपासणी करून घ्यावी आणि आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे गडचिरोली, चमोर्शी, धानोरा, येथील 13 VIA positive महिलांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉ. आखाडे यांच्याद्वारे उपचार करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजनाकरीता NCD विभागाचे समन्वयक डॉ. प्रेरणा राऊत व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा