परीक्षा केंद्राच्या परिसरात २०० मीटरपर्यंत मनाई आदेश लागू

गडचिरोली, (जिमाका) दि. ४ : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात येणारी कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट – पोस्ट ग्रॅज्युएशन (CUET-PG) 2026 ही परीक्षा दिनांक ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १६, १७, १८, १९, २४, २५ व २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड, कन्नमवार नगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर परीक्षा शांततेत व सुरळीत वातावरणात पार पडावी तसेच परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केला आहे.

या आदेशानुसार परीक्षा कालावधीत निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स व एसटीडी बूथ सुरू ठेवण्यास मनाई राहील. तसेच परीक्षा केंद्र व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा आदी उपकरणांचा वापर करण्यास बंदी राहणार आहे. याशिवाय निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करणे किंवा घोषणा देणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.

तसेच पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली असून शस्त्र, काठ्या, लाठ्या, सुरे, तलवारी, भाले, बंदुका किंवा इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू तसेच दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रापासून २०० मीटर अंतरावर चुन्याची सीमारेषा आखण्यात येणार आहे.

सदर आदेश कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठ अधिकारी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही. तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या आदेशातील कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. हा मनाई आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.