कुरखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन.
गडचिरोली, (जिमाका) दि.28 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.01 हा दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ते 15 मे 2026 या कालावधी मध्ये कढोली मंडळात दिनांक 07.03.2026 रोजी, मालेवाडा मंडळात दिनांक 14.03.2026 रोजी, पुराडा मंडळात दिनांक 10.04.2026 रोजी व कुरखेडा मंडळात दिनांक 08.05.2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आलेला आहे.
उपरोक्त कालावधीत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग सेवा निवृत्ती वेतन योजना इत्यादीपैकी एका विशिष्ट योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असणा-या सर्व संभाव्य पात्र लाभार्थ्यांना महसूल सेवक हे आपलेकडे गृहभेट देणार आहेत.
तरी, संबंधीत लाभार्थ्यांनी त्यांचे आधारकार्डशी मोबाईल क्रमांक व बँक खाते क्रमांक जोडलेला नसल्यास तातडीने नजीकचे आधारकेंद्रात जावून आधारकार्ड अद्यावत करून घ्यावे. तसेच त्यांचे बँक खाते क्रमांकाशी आधारकार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक जोडलेला नसल्यास तातडीने संबंधीत बँकेत जावून त्यांचे बँक खाते क्रमांकाशी आधारकार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक जोडून घ्यावे. व गृहभेटीसाठी आलेल्या महसूल सेवकास प्रकरणातील आवश्यक संपुर्ण दस्तऐवज देणे व अर्जातील माहिती भरून घेण्यासाठी आपल्या घरी थांबून राहावे. असे आवाहन तहसिलदार, कुरखेडा यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा