पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली, (जिमाका) दि. १२ : Guardians Training Academy Hyderabad Pvt Ltd., जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन टप्प्यामध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे. पहिला टप्यामध्ये दिनांक १७/०३/२०२६ ते २५/०३/२०२६ या कालावधीत वेळ स.११.०० ते दू.४.०० वाजेपर्यंत रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यांत आले आहे. तसेच दूस-या टप्प्यामध्ये दिनांक ०६/०४/२०२६ ते १५/०४/२०२६ या कालावधीत वेळ स.११.०० ते दू.४.०० वाजेपर्यंत भरती मेळावा सर्व तालुक्यामध्ये आयोजित करण्यांत आले आहे. सदर रोजगार मेळावे तारखानूसार सर्व तालुकानिहाय तालुक्यातील पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यांत येत आहे.

        सदर रोजगार मेळाव्यामध्ये Guardians Training Academy Hyderabad Pvt Ltd या संस्थेकडून Security Guard व Security Supervisor या पदांकरीता उमेदवारांचे प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यांत येणार आहे. सदर पदांचे वेतन रू.१८०००/- ते रू . ३००००/- पर्यंत राहणार आहे. करिता सदर पदांकरीता १९ ते ४५ वयोगटातील ईच्छूक असलेले गडचिरोली जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र, ( १० वी पास /नापास , १२ वी ,पदवी पदविधर ) गुणपत्रक, आधार कार्ड,मतदान ओळखपत्र,बॅक पासबुक ( मुळ व झेराक्स ), पोलीस व्हेरीफीकेशन , फोटो -६, डॉक्टर कडून मेडीकल फिटनेस प्रमाणपत्र इत्यादी सह स्व:खर्चाने वेळ स.११.०० ते दू.४.०० वाजेपर्यंत खालील नियोजित तारखानूसार दिलेल्या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-२ युनिट क्रं-२,कॉम्प्लेक्स,गडचिरोली कार्यालयाशी व दुरध्वनी क्र.०७१३२-२२२३६८ वर संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार वउद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

 रोजगार मेळाव्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे-
 पहिला टप्पा :-

अ.क्र दिनांक तालुका मेळाव्याचे ठिकाण मेळाव्याची वेळ
१. १७/०३/२०२६ कोरची पंचायत समिती,सभागृह ,कोरची
सकाळी ११.०० ते
सायंकाळी ४.००
२. १८/०३/२०२६ कुरखेडा पंचायत समिती,सभागृह , कुरखेडा
३. २३/०३/२०२६ वडसा पंचायत समिती,सभागृह ,वडसा
४. २४/०३/२०२६ आरमोरी पंचायत समिती,सभागृह, आरमोरी
५. २५/०३/२०२६ धानोरा पंचायत समिती,सभागृह , धानोरा

दूसरा टप्पा :-

अ.क्र दिनांक तालुका मेळाव्याचे ठिकाण मेळाव्याची वेळ
१. ०६/०४/२०२६ चामोर्शी पंचायत समिती,सभागृह, चामोर्शी
सकाळी ११.०० ते
सायंकाळी ४.००
२. ०७/०४/२०२६ मुलचेरा पंचायत समिती,सभागृह , मुलचेरा
३. ०८/०४/२०२६ आलापल्ली पंचायत समिती,सभागृह, आलापल्ली
४. ०९/०४/२०२६ अहेरी पंचायत समिती,सभागृह, अहेरी
५. १०/०४/२०२६ भामरागड पंचायत समिती,सभागृह , भामरागड
६. १३/०४/२०२६ सिरोंचा पंचायत समिती,सभागृह , सिरोंचा
७. १५/०४/२०२६ गडचिरोली पंचायत समिती,सभागृह , गडचिरोली
                    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.