१६ मार्च रोजी महिला लोकशाही दिन

गडचिरोली, (जिमाका) दि.०४ : जिल्ह्यातील महिलांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण व्हावे तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार दि.१६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांना त्यांच्या वैयक्तिक समस्या, गाऱ्हाणी व अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. या दिवशी महिलांच्या कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तिक समस्या ऐकून त्यांचे लेखी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

मात्र न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा विषयक व आस्थापना विषयक बाबी तसेच विहित नमुन्यात नसलेले किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घ्यावी. अर्ज हे वैयक्तिक स्वरूपाचे असून आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये सादर करणे आवश्यक आहे.

अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरेक क्र. १, खोली क्र. २६ व २७, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे निःशुल्क उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील पीडित व समस्याग्रस्त महिलांनी आपले अर्ज सादर करून महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.