गतका व कलरीपयत्तू जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन.
गडचिरोली, (जिमाका) दि.28 : शासनामार्फत ज्या खेळ प्रकारामधुन महाराष्ट्र राज्याचा संघ राष्ट्रीय स्वरावरील स्पर्धेसाठी ज्या कार्यपद्धतीनुसार निवडण्यात येतो, त्या कार्यपद्धतीनुसार गतका व कलरीपयत्तू या खेळांचे संघ राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी पाठविण्यात येतील. तथापी सदर खेळाच्या जिल्हा, विभाग व राज्यस्तरापर्यंतच्या स्पर्धा आयोजनाची प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक जबाबदारी संपुर्णपणे संबंधित खेळ संघटनांची राहील. तसेच सदर खेळांच्या आयोजन करीत असताना प्राथमिक स्तरावर सहभागी / प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंना खालील लाभ अनुज्ञेय असणार नाहीत. या अटी व शर्तीच्या अधिन राहुन मान्यता प्रदान करण्यात येणार आहे.
1. शासकीय तसेच अशासकीय नोकऱ्यांमधील 5 टक्के खेळाडू आरक्षण
2. क्रीडा गुण सवलत
3. शिष्यवृत्ती
4. इयत्ता 11 वी व्या प्रवेशाकरीता खेळाडू आरक्षण
5. संघटनेमार्फत आयोजित स्पर्धांसाठी शासनाचे मनुष्यबळ, आर्थिक व तांत्रिक मदत उपलबध करुन दिली जाणार नाही.
त्याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील गतका व कलरीपयत्तू या खेळांचे अधिकृत संघटनांनी स्पर्धा आयोजनाकरीता दि. 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज मांगविण्यात आले होते परंतु संबंधित खेळांचे अधिकृत संघटनांकडून अर्ज प्राप्त न झाल्यामुडे मुद्दतवाढ देऊन गडचिरोली जिल्ह्यातील गतका व कलरीपयत्तू या खेळांचे अधिकृत संघटनांकडून स्पर्धा आयोजनाकरीता दि. ०९ मार्च 2026 पर्यंत अर्ज मांगविण्यात येत आहे. अधिक माहिती करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, भास्कर घटाळे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा