क्रीडा ई-प्रमाण

खेळाडूंच्या ५% आरक्षणासाठी प्रणालीवर अभिलेख उपलब्ध; त्वरित नोंदणी करून, घरबसल्या प्रमाणपत्र मिळवा.

गडचिरोली, (जिमाका) दि.११ : महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५% आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने क्रीडा “ई-प्रमाण” ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अध्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे.

प्रणालीची वैशिष्ट्ये आणि महत्व

• ब्लॅाकचेन तंत्रज्ञान : ही प्रणाली ब्लॅाकचेन (Blockchain) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करणे शक्य नाही, ज्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल.
• त्वरित पडताळणी : खेळाडूने माहिती भरल्यानंतर आणि मूळ डेटाशी ती जुळल्यास, अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो.
• QR कोड सुरक्षा : प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय क्यूआर कोड असेल जो स्कॅन करून संबंधित नियुक्ती प्राधिकारी (उदा. MPSC, पोलीस भरती) प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील.

आगामी पदभरतीसाठी “क्रीडा ई-प्रमाणपत्र” बंधनकारक: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या “क्रीडा ई-प्रमाणपत्राची” प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी.

ज्या खेळाडूने यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्राची पडताळणी केलेली आहे, त्यांनी यापुढे शासकीय व निमशासकीय भरतीसाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास, या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे.

प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची पद्धत :

या प्रणाली अंतर्गत ५% खेळाडू आरक्षणाचे संघटनेमार्फत प्राप्त अभिलेख “क्रीडा ई-प्रमाण” पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात येत आहेत. या अभिलेखाद्वारे खेळाडू आपले पाच % खेळाडू प्रमाणपत्र प्राप्त करून येऊ शकतात, यासाठी आवश्यक असणारा तपशील पुढील प्रमाणे
खेळाडूने पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य : ज्या खेळाडूंनी अधिकृत स्पर्धा मध्ये प्रावीण्य मिळवले आहे अशा सर्व खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://sports.maharashtra.gov.in भेट द्यावी.
संकेतस्थळावर सर्वात खाली आमच्या सेवा (Our Services) मध्ये ५ % Reservation या टॅब मध्ये जाऊन आपली एक वेळ नोंदणी पूर्ण करावी, या नोंदणी करिता, वैयक्तिक माहिती व “क्रीडा ई-प्रमाण” पोर्टलवर अर्ज या सर्व बाबींसाठी खालील माहिती खेळाडूने तयार ठेवावी.

१. नोंदणीसाठी खेळाडूंनी आपल्या आधार संलग्न (Aadhaar-linked) मोबाईल क्रमांकाचा आणि आयडी चा वापर करणे आवश्यक आहे (Mobile No.)
२. स्वतःचा योग्य व दैनंदिन वापर ईमेल आयडी (Email ID)
३. आधार कार्ड पीडीएफ (Aadhar ID pdf format)
४. क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्राविण्य प्रमाणपत्र (certificate of the competition pdf format)

ज्या खेळाचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहे, त्यांनी तात्काळ या प्रणालीचा लाभ घेऊन आपले डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र घर बसल्या प्राप्त करून घ्यावे.

स्पर्धेचे अभिलेख उपलब्ध नसल्यास “Grievance” द्वारे अर्ज करा ज्या खेळाडूंची माहिती अभिलेखात किंवा प्रमाणपत्रे तांत्रिक कारणास्तव प्रणालीवर दिसत नसतील, तर support@kridaepramaan.org या ईमेल वर आपली तक्रार आपल्याकडे असलेल्या क्रीडा प्रमाणपत्रासह नोंदवा. खेळाडूने आपले निवेदन सादर करताना खालील बाबींची पूर्तता करावी.

• आपण सहभागी झालेल्या स्पर्धेचे अचूक नाव व वर्ष नमूद करावे.
• आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मूळ क्रीडा प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत निवेदनासोबत जोडावी. असे अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभाग स्तरावर ज्या माहितीची शहानिशा करून सदर अभिलेख पोर्टलवर अध्यायावत करण्याची कार्यवाही केली जाईल.

अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शन सूचनासाठी खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अन्य खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध करून दिल्यानंतर त्याबाबतची माहिती त्वरित याद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

महत्त्वाची सूचना : कबड्डी, फेन्सींग, ट्रायथलॉन (२०२५ ची स्पर्धा) ज्युडो (२०२४ ची स्पर्धा) कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) ह्या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध आहेत, त्याच खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत इतर पात्र खेळांच्या खेळाडूंनी नोंदणी करावी इतर अभिलेख देखील अपलोड करण्याची कार्यवाही सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.