येनापुर-जयरामपूर मार्गावरील वाहतुक प्रतिबंधित
गडचिरोली, (जिमाका) दि.०९ : पोलीस स्टेशन, आष्टी हद्दिअंतर्गत मेमर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमीटेड कंपनीचा लोह प्रकल्प मोजा कोनसरी येथे सुरु असून सदर प्रकल्पाकरीता मोजा मुधोली चक नं. २ पारडी देव (रिठ) व जयरामपूर येथील खाजगी शेतजमीन व शासकीय जमीनीचे मोजणी व भुसंपादन दिनांक ११ मार्च २०२६ रोजी पासुन होणे प्रस्तावित असून सदर गावामध्ये शेतजमीन भुसंपादनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने कारवाई करतांना शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे आंदोलने, निदर्शने अथवा विरोध प्रदर्शन होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होण्याची शक्यता असल्यामुळे येनापुर ते जयरामपूर कडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुक प्रभावीत होऊन जमावाकडून अनुचित प्रकार घडुन त्या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना व लोकांना त्रास होऊ नये याकरीता येनापुर ते जयरामपूर कडे जाणारा मार्ग दिनांक १० मार्च २०२६ ते १४ मार्च २०२६ रोजीपर्यंत वाहतुक रहदारीकरीता सदर मार्ग बंद करण्यास या कार्यालयास विनंती केलेली आहे.
त्यामुळे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन याव्दारे आदेशित करीत आहे की, येनापुर ते जयरामपूर दोन्ही बाजुने सर्व प्रकारचे वाहनांची वाहतुक (प्रवासी बसेस व पाणी पुरवठा/ महावितरण / दुरसंचार / रस्ते दुरुस्तीसंदर्भातील वाहने वगळून) वाहनांना दिनांक १० मार्च, २०२६ ते दिनांक १४ मार्च, २०२६ रोजी पर्यत प्रवासास मज्जाव असेल.
मोटर वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ व ११६ चे तंतोतंत पालन करावे. तसेच सदरचे आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कोणत्याही वाहतुकदारास व व्यक्तीविरुध्द भारतीय दंड संहिता १८६०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे प्रचलीत नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना असेल. असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली, अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा