मौजा फोदेवाडा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत

गडचिरोली, (जिमाका) दि.०९ :उपपोलीस स्टेशन, लाहेरी अंतर्गत मौजा- फोदेवाडा जंगल परिसरात, दि.५  फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकी दरम्यान ७ नक्षल मृतदेह( ४ पुरुष ३ महिला) शस्त्रासह आढळुन आल्याचे व एक पोलीस शिपाई शहिद झाल्याचे कळविण्यात आले आहे. सदर घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तींचे/मृतदेहाचे कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने, सदर प्रकरणात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी करावयाचे आहे. तरी जाहिररित्या सुचित करण्यात येते की, या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशी मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांचे न्यायालयात जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून १५ दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत. असे उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली, अमर राऊत यांनी कळविले आहे.

चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन लेखी निवेदन द्यावे. आपण पाहिल्याप्रमाणे घटनेचे वर्णन, आपला या घटने विषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधित काही घटना घडली असल्यास त्या विषयी माहिती सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी आपले म्हणणे, या घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.