पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

इमेज
अहेरी तालुका, दिनांक-31/10/25 - मौजा छल्लेवाडा येथे आज मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. छल्लेवाडा गावातील प्रमुख नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करून अजय कंकडालवार यांच्या गडात भगदाड पाडले आहे. या प्रवेश सोहळ्यात किष्ठू बोरकर, राजाराम दुर्गे, तिरुपती दुर्गे, शंकर दहावगावकर, लक्ष्मण जुमडे, तुकाराम बोरकर, तुकाराम जुमडे, देवाजी जुमडे, दिवाकर जुमडे, कमलाकर जगजंपुला, दिवाकर वनकर, प्रभाकर वनकर, जिवन भसारकर, व्येंकटी बोरकर, आनंदराव दुर्गे आणि गणपती डोंगरे या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या उपस्थितीत सर्वांनी पक्षाचा झेंडा स्वीकारला. या वेळी कार्यकर्त्यांनी भाग्यश्रीताई यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षबांधणीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना, छल्लेवाडा गावातील हा प्रवेश अजय कंकडालवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून छल्लेवाडा हा कंकड...

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी - भाग्यश्रीताई आत्राम यांची मागणी.

इमेज
अहेरी (प्रतिनिधी) :- गेल्या काही दिवसांपासून अहेरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कापणीस आलेले धान, कापूस तसेच इतर पिकांवर या अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी अहेरी येथील तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना निवेदन देऊन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे तात्काळ पंचनामे करून त्यांना योग्य नुकसानभरपाई व आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच भाग्यश्रीताई आत्राम यांनी सांगितले की, “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा. पंचनामे तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल याची काळजी प्रशासनाने घ्यावी.” या निवेदनावेळी श्रीनिवास वीरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, अब्दुल रहमान, सुमित मोतकुरवार, ॲड. प्रभाकर डोंगरे, सुनील रत्नम, अनिल रत्नम, किष्ठू बोरकर, राजाराम दुर्गे, सुधाकर सुंदीला, तिरुपती दुर्गे, शंकर दहावगावकर, लक्ष्मण जुमडे, ...

मुख्य अभियंता व कंत्राटदारावर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करा – सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मागणी.

इमेज
सिरोंचा,   दिनांक 26/10/2025 :– सिरोंचा तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशनसमोर झालेल्या भीषण अपघातात पिंटीपाका येथील ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक किंवा सावधानता फलक न लावल्याने हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या निष्काळजीपणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार ए. सी. शेख कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांच्यावर ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा’ दाखल करण्याची मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने चालकाचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी बामणी गावाजवळ ट्रॅक्टर चालवित असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. घटनास्थळीच चालकाचा मृत्यू झाला. स्थानिकांनी सांगितले की, महामार्गावर धोक्याचे किंवा दिशा दर्शविणारे कोणतेही फलक नसल्याने चालकाला पुढील वळणाची कल्पना आली नाही, परिणामी अपघात झाला. २ कोटी रुपयांची...