महिला आयोग आपल्या दारी : जनसुनावणीत ४४ तक्रारींवर जागेवरच कार्यवाही.
महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध; राज्यात ५ हजार प्रकरणे निकाली – रुपाली चाकणकर. गडचिरोली, (जिमाका) दि.20 : 'महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जनसुनावणीमध्ये आज प्राप्त सर्व ४४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नियोजन भवन येथे आयोजित जनसुनावणीला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय आसवले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अ.पू. खानोलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) दीपक बानाईत, नगराध्यक्षा प्रणोती निंभोरकर यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना श्रीमती रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, महिलांना न्याय मिळवण्यासाठी मुंबईत चकरा माराव्या लागू नयेत, स्थानिक पातळीवरच त्यांच्या तक्रारींचा जागेवर निप...