पर्यावरण रक्षणाची गरज: निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जबाबदारीची वेळ.

28 जून 2025  विशेष 
आजच्या घडीला संपूर्ण जगासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास. झपाट्याने होणारी औद्योगिक प्रगती, वनोत्पाटन, वाढते प्रदूषण आणि हवामानातील अनियमित बदल यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षण हा फक्त शासनाचा नाही तर प्रत्येक नागरिकाचा नैतिक आणि सामाजिक दायित्वाचा भाग बनलेला आहे.

महाराष्ट्रात सुद्धा अनेक भागांमध्ये दरवर्षी तापमानात वाढ, अनियमित पाऊस, जलस्त्रोत आटणे आणि जैवविविधतेवर परिणाम दिसून येत आहे. जंगलतोडीमुळे आदिवासी समाजाचे पारंपरिक जीवन धोक्यात आले आहे, तर शहरांमध्ये वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

संविधानाच्या कलम ४८-अ नुसार, पर्यावरणाचे रक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे, तर कलम ५१-अ (g) नुसार, निसर्ग व पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे.

शासनाकडून ‘हरित महाराष्ट्र’, ‘माझी वसुंधरा’, ‘वृक्षलागवड मोहीम’ अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे. मात्र, ही जबाबदारी फक्त सरकारवर टाकून भागणार नाही. आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल.

पर्यावरण रक्षणासाठी काही महत्त्वाचे उपाय:

प्लास्टिकचा वापर कमी करणे

झाडे लावणे व संगोपन करणे

पाण्याचा अपव्यय टाळणे

सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे

पारंपरिक उर्जेसाठी पर्यायांचा अवलंब

निसर्ग टिकवला तरच आपले भवितव्य टिकणार – ही जाणीव सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात नैसर्गिक आपत्ती, अन्न व पाण्याची टंचाई आणि रोगराई यासारख्या संकटांना सामोरे जावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.