पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यावरण रक्षणाची गरज: निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जबाबदारीची वेळ.

इमेज
28 जून 2025  विशेष   आजच्या घडीला संपूर्ण जगासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास. झपाट्याने होणारी औद्योगिक प्रगती, वनोत्पाटन, वाढते प्रदूषण आणि हवामानातील अनियमित बदल यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षण हा फक्त शासनाचा नाही तर प्रत्येक नागरिकाचा नैतिक आणि सामाजिक दायित्वाचा भाग बनलेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा अनेक भागांमध्ये दरवर्षी तापमानात वाढ, अनियमित पाऊस, जलस्त्रोत आटणे आणि जैवविविधतेवर परिणाम दिसून येत आहे. जंगलतोडीमुळे आदिवासी समाजाचे पारंपरिक जीवन धोक्यात आले आहे, तर शहरांमध्ये वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. संविधानाच्या कलम ४८-अ नुसार, पर्यावरणाचे रक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे, तर कलम ५१-अ (g) नुसार, निसर्ग व पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. शासनाकडून ‘हरित महाराष्ट्र’, ‘माझी वसुंधरा’, ‘वृक्षलागवड मोहीम’ अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे. मात्र, ही जबाबदारी फक्त सरकारवर टाकून भागणार नाही. आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. पर्यावरण रक्षणासाठी का...

एफ.डी.सी.एम. विभाग, आलापल्लीतील तिन्ही वनपरिक्षेत्र कार्यालय 'दुपार बंद', नागरिकांमध्ये नाराजी.

इमेज
अहेरी : प्राणहिता वन प्रकल्प अंतर्गत एफ.डी.सी.एम. (महाराष्ट्र वन विकास महामंडळ) विभागाचे आलापल्ली येथील अहेरी वनपरिक्षेत्र कार्यालय, आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय आणि फिरते पथक कार्यालय ही तिन्ही कार्यालये दुपारी १२ वाजेच्या सुमारास बंद करून थेट ३.३० वाजता सुरु केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मागील तीन-चार महीण्यांपासून हे प्रकार सातत्याने घडत असून कामासाठी येणाऱ्या नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात विभागीय सहाय्यक व्यवस्थापक *अमोल केंद्रे* यांच्याशी संपर्क साधून माहिती विचारली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ केली. कार्यालय बंद ठेवण्यासंदर्भातील कोणतेही शासन परिपत्रक आहे का, याबाबत विचारणा केली असता, "कार्यालय बंद असो की सुरु, तुम्ही काम सांगा" असे म्हणत त्यांनी प्रशासनिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. वनपरिक्षेत्र अधिकारी देखील याबाबत स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ करत असून, "हे आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आहेत, आम्हाला काही माहिती नाही" असे म्हणत जबाबदार...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे युवा नेते ऋतुराज हलगेकर यांचा वाढदिवस रुग्णांना फळवाटप करून साजरा.– सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम.

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे युवा व सक्रिय नेते मा. ऋतुराज हलगेकर यांचा वाढदिवस आज अत्यंत सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, अहेरी येथे रुग्णांना फळांचे वाटप करून या दिवशी सेवा आणि मदतीचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाच्या विभागीय अध्यक्षा मा. शाहीनताई हकीम यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली**त्यांनी ऋतुराज हलगेकर यांचे कौतुक करताना सांगितले की, "आजच्या पिढीतील तरुणांनी ऋतुराजसारखे समाजकार्याच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत उतरले पाहिजे. वाढदिवस साजरा करताना आनंदाबरोबर समाजासाठी काहीतरी सकारात्मक देण्याची ही भावना स्तुत्य आहे." कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध रीतीने करण्यात आले होते. रुग्णालयातील सर्वच रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस करण्यात आली. उपस्थित रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनीही हा उपक्रम अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगुनवार, ज्येष्ठ नेते श्रीनिवास चटारे,  स्वप्निल ...

रानटी हत्तीचा त्वरित बंदोबस्त करा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची मागणी.

गडचिरोली तालुक्यातील नवरगाव येथे रात्री दीड वाजताच्या सुमारास रानटी हत्तीने शेतकऱ्यांच्या शेतासोबतच घरातील सामानाचे व धान्याची नासधूस केली. त्यामुळे आता रानटी हत्ती हे जंगलापुरते मर्यादित न राहता गावामध्ये सुद्धा नुस्कान करीत आहेत.  तेव्हा या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शासनाने त्वरित जंगली  हत्तीची बंदोबस्त करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभाचे क्षेत्राचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.