सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.
वेलगुर (ता. अहेरी, जि. गडचिरोली), दि. ०४ जुलै २०२५ रोजी दुपारी-१२.३० वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील वेलगुर टोला वळणाजवळ एक भीषण अपघात घडला. सुरजागड खाणीतून लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक (MH-३४ BZ-६८०२) आणि स्कॉर्पिओ (MH-३३ Y-९९९१) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः समोरील उजव्या बाजूचा चक्काचूर झाला. सदर स्कॉर्पिओ गाडी अमीत येनपेरेड्डीवार यांची असून, ते स्वतः चालक होते. त्यांच्या सोबत विशेष भटपलीवार हे देखील गाडीत होते. अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची वेगमर्यादा, ओव्हरलोडिंग व रस्त्याची धोकादायक स्थिती हे संभाव्य कारण म्हणून स्थानिकांकडून चर्चिले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा