छल्लेवाडा येथील राजमणी गुरनुले घेणार पाकशास्त्रात पदवीचे शिक्षण.
'शाळेबाहेरची शाळा' कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आपले मत.
छल्लेवाडा:- दि-२५ ऑगष्ट २०२२ रोजी जि.प. उच्च. प्राथ. शाळा, छल्लेवाडा येथील इयत्ता सातवी मध्ये शिकणारी विध्यार्थीनी राजमणी नागेश गुरनुलेची नागपूर आकाशवाणी वरून मुलाखत घेण्यात आली. या दरम्यान राजमणी मुलाखतीमध्ये आपले मत व्यक्त करतांना सांगितलं कि मला स्वयंपाक कामात खूप आवड आहे. त्यामुळे मी पाकशास्त्रात पदवी शिक्षण घेऊन यात करियर करण्याचे ठरविले आहे असे तिने मत व्यक्त केले.
'शाळेबाहेरची शाळा' हा उपक्रम या गावात नियमित ऐकला जात असून येथील शिक्षक पालक व मुलांसोबत नेहमीच नवनवीन ऍक्टिव्हिटी करत असतात. त्यामुळे या गावात शैक्षणिक वातावरण नेहमीच पाहायला मिळते. या अगोदर याच गावातील रक्षा गुरनुले ही विध्यार्थीनी सुद्धा या कार्यकमात सहभागी होऊन मुलाखत दिलेली आहे. मुलांच्या जीवनात नवनवीन कलागुणांना वाव देऊन त्यांची आवड लक्षात घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्याचे कार्य शाळेतील शिक्षक वर्गांकडून केले जात आहे. 'शाळेबाहेरची शाळा' च्या संपूर्ण टीम नी गावातील शिक्षक, पालक व विध्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
अहेरी तालुक्यात कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, निर्मला वैद्य, गटशिक्षणाधिकारी अहेरी, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सुरु असून मुलाखतीसाठी सुनील आईंचवार केंद्रप्रमुख, कल्पना रागिवार मुख्याध्यापिका, मार्गदर्शक शिक्षक सुरजलाल येलमुले, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे मार्गदर्शक श्रीकांत पावडे, सुरज चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हेमंत सभावट शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अनिता शेंडे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष छल्लेवाडा, बाबुराव कोडापे, मुसली जुमडे, निलिमा पातावार,अनंता सिडाम, आई - कमला गुरनुले, वडील - नागेश गुरनुले, भाऊ - रतन गुरगुले, आजोबा- मारन्ना गुरनुले, आजी - कौशल्या गुरनुले, शालेय मित्र मैत्रिणी व गावकरी यांनी सहकार्य करून राजमणीचे कौतुक केले आहे.
प्रथम एज्युकेशन गडचिरोली, निपुण भारत गडचिरोली, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, जिल्हा परिषद गडचिरोली, पी अँड जी शिक्षा, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर , यांचे मार्गदर्शनात मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ‘शाळेबाहेरची शाळा' या आकाशवाणी वरील प्रसारणाने खेळापाळ्यातील मुलांच्या म्हणात शैक्षणिक जनजागृती करून मुलांना अभ्यासाशी जोडून ठेवण्याचे मोठे कार्य करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा