अमृत महोत्सव जनजागृती बॅनर फाडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा- शिवसेना तालुका प्रमुख मनीष दुर्गे व इतर यांची मागणी.
एटापल्ली :- एटापल्ली शहरात शिवसेनाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य नागरिकांमध्ये देशप्रेम व देशभक्तीची जनजागृतीपर लावण्यात आलेले बॅनर फाडून राष्ट्रीय महोत्सवाचा अपमान करणाऱ्या अज्ञात आरोपीं विरुद्ध शिवसेना प्रमुख मनीष दुर्गे व इतर कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिल्याने तालुका शिवसेना, भाकपा व इतर पक्षांच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक व कला महोत्सव कार्यक्रम आयोजित करून अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला होता.
शिवसेनेच्या वतीने शहरात बॅनर लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्याची जनजागृती करण्यात आली होती. मात्र शहरातील काही समाज कंठकांनी शिवसेनेकडून लावण्यात आलेले तिन बॅनरांना १५ ऑगस्ट रोजी सोमवारी रात्री नऊ वाजता दरम्यान फाडून कचऱ्यात टाकण्यात आले होते. त्यामुळे बॅनरवर असलेल्या राष्ट्रध्वज तिरंगाचा अपमान झाला आहे.
तेव्हा बॅनर फाडणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा कसुन शोध घेऊन फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी तालुका शिवसेना प्रमुख मनीष दुर्गे, विनोद चव्हाण, सचिन मोतकुलवार, सलीम शेख, नगरसेवक नामदेव हिचामी, अक्षय पुंगाटी व इतर कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन, एटापल्ली येथील पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा