पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छल्लेवाडा येथील राजमणी गुरनुले घेणार पाकशास्त्रात पदवीचे शिक्षण.

इमेज
'शाळेबाहेरची शाळा' कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आपले मत.           छल्लेवाडा :- दि-२५ ऑगष्ट २०२२ रोजी जि.प. उच्च. प्राथ. शाळा, छल्लेवाडा येथील इयत्ता सातवी मध्ये शिकणारी विध्यार्थीनी राजमणी नागेश गुरनुलेची नागपूर आकाशवाणी वरून मुलाखत घेण्यात आली. या दरम्यान राजमणी मुलाखतीमध्ये आपले मत व्यक्त करतांना सांगितलं कि मला स्वयंपाक कामात खूप आवड आहे. त्यामुळे मी पाकशास्त्रात पदवी शिक्षण घेऊन यात करियर करण्याचे ठरविले आहे असे तिने मत व्यक्त केले. 'शाळेबाहेरची शाळा' हा उपक्रम या गावात नियमित ऐकला जात असून येथील शिक्षक पालक व मुलांसोबत नेहमीच नवनवीन ऍक्टिव्हिटी करत असतात. त्यामुळे या गावात शैक्षणिक वातावरण नेहमीच पाहायला मिळते. या अगोदर याच गावातील रक्षा गुरनुले ही विध्यार्थीनी सुद्धा या कार्यकमात सहभागी होऊन मुलाखत दिलेली आहे. मुलांच्या जीवनात नवनवीन कलागुणांना वाव देऊन त्यांची आवड लक्षात घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्याचे कार्य शाळेतील शिक्षक वर्गांकडून केले जात आहे. 'शाळेबाहेरची शाळा' च्या संपूर्ण टीम नी गावातील शिक्षक, पालक व विध्यार्थ्यांना खूप ...

अमृत महोत्सव जनजागृती बॅनर फाडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा- शिवसेना तालुका प्रमुख मनीष दुर्गे व इतर यांची मागणी.

इमेज
एटापल्ली :- एटापल्ली शहरात शिवसेनाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य नागरिकांमध्ये देशप्रेम व देशभक्तीची जनजागृतीपर लावण्यात आलेले बॅनर फाडून राष्ट्रीय महोत्सवाचा अपमान करणाऱ्या अज्ञात आरोपीं विरुद्ध शिवसेना प्रमुख मनीष दुर्गे व इतर कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार  दिली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिल्याने तालुका शिवसेना, भाकपा व इतर पक्षांच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक व कला महोत्सव कार्यक्रम आयोजित करून अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला होता. शिवसेनेच्या वतीने शहरात बॅनर लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्याची जनजागृती करण्यात आली होती. मात्र शहरातील काही समाज कंठकांनी शिवसेनेकडून लावण्यात आलेले तिन बॅनरांना १५ ऑगस्ट रोजी सोमवारी रात्री नऊ वाजता दरम्यान फाडून कचऱ्यात टाकण्यात आले होते. त्यामुळे बॅनरवर असलेल्या राष्ट्रध्वज तिरंगाचा अपमान झाला आहे.  तेव्हा बॅनर फाडणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा कसुन शोध घेऊन फौजदारी क...