सिनेट सदस्य निवडणूकीत शिवसेना रिंगणात उतरणार, सदस्य नोंदणी कार्यक्रमाची जय्यत तयारी, शिवसैनिकांनी कामाला लागावे किशोर पोतदार यांचे आव्हान.

अहेरी दि-१२/०५/२०२२ :- शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्व तसेच युवासेना प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मा. ना. एकनाथ शिंदे साहेब, नगर विकास मंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्री किरण पांडव साहेब जिल्हा समन्वयक यांच्या विशेष सहकार्याने नागपूर विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निवडणुका होणार आहेत त्याची जय्यत तयारी सुरू आहे. सिनेट निवडणुका संबंधी आज शिवसेना जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मा. किशोर पोतदार साहेब यांच्या अध्यक्षते खाली आणि सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे व रियाज शेख जिल्हा प्रमुख, सौ. करुणा ताई जोशी महीला आघाडी जिल्हा संघटक, दिलीप सुरपाम युवासेना जिल्हा अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख किशोर पोतदर यांनी मार्गदर्शन करताना अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्ष वाढीसाठी युवासेना युवतीसेना संघटना कशी बळकट करता येईल व येणाऱ्या सिनेट निवडणुकांमध्ये सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेचा भगवा गोंडवाना विद्यापीठात कस फडकवता येईल याकडे सर्वांनी लक्ष देऊन प्रत्येक गावातुन प्रत्येक तालुक्यातुन पदवीधर स्त्री व पुरूष तसेच युवक युवतींना जोडुन शिवसेना सिनेट सदस्य निवडून आणण्याकरिता तालुका प्रमुखांना आदेश दिले. तसेच सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे यांनी गोंडवाना विद्यापीठ येथे सिनेट सदस्य निवडुन देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवता येईल. जेणेकरून गोंडवाना विद्यापीठात शिवसेनेचा बोलबाला राहणार आणि विद्यापीठा संबंधी जे काही अडचणी असतील त्यांना सिनेट सदस्य निवडून आणून शिवसेना सडेतोड उत्तर देणार. अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रियाजभाई शेख यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना युवासेना जोमाने कामाला लागा असे प्रतिपादन दिले तसेच या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कुठेतरी शिवसेना मार्फत आशेचे किरण व त्यांच्या अडचणी हे दूर करता येईल याकडे शिवसेना युवा सेना सदैव तत्पर राहील असे आश्वासन दिले. जेणेकरून अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदवीधर युवक-युवतींना कुठेतरी न्याय मिळेल याकडे लक्ष देऊ असे सांगितले. 

या बैठकीत जिल्हा संघटक विलास ठोंबरे साहेब, जिल्हा संघटिका करुणाताई जोशी, युवासेना जिल्हाप्रमुख दिलीप भाऊ सुरपाम, युवतीसेना जिल्हाप्रमुख तुळजा ताई तलांडे, तालुका संघटक दुर्गेश तोकला, सिरोंचा तालुकाप्रमुख अमित तीपट्टी, मनीष दुर्गे शिवसेना तालुका प्रमुख एटापल्ली, गौरव बाला मुलचेरा तालुका प्रमुख, नौरास शेख नगर सेविका अहेरी, उज्वल तिवारी शिवसेना शोसल मीडिया जिल्हा प्रमुख, महेश मोहुरले युवासेना तालुका प्रमुख अहेरी, शहर प्रमूख नकिर शेख, उप शहर प्रमूख अयान पठाण, मारोती सिडाम ,अक्षय पुंगाटी युवासेना तालुका प्रमुख एटापल्ली, राजेश गुंतीवार युवासेना तालुका प्रमुख मुलचेरा, अरुणाताई निकोडे तालुका प्रमुख अहेरी, प्रफुल येरणे उप तालुका प्रमुख, सुनील वासनिक, नीलकमल मंडल, शहर प्रमूख, दीपक विश्वास, दुर्गेश तोकला, तालुका संघटक, संघटिका एटापल्ली ,पायल कुंभारे युवतीसेना तालुका प्रमुख एटापल्ली, सुमित खन्ना युवासेना शहर प्रमुख, नेहाल कुंभारे युवासेना उपशहर प्रमुख, दीपक दत्ता समन्वयक एटापल्ली सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.