“वखार आपल्या दारी, वखार महामंडळाचे वचन शेतमालाचे संरक्षण अभियानाचे” कार्यशाळा संपन्न.
गडचिरोली, दि.26 :एकदिवशीय शेतकरी कार्यशाळा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शेतमाल साठवणुकीच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा ,यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ , कृषी विभाग व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित यांचा संयुक्त विद्यमाने “ वखार आपल्या दारी, महामंडळाचे वचन शेतमाल संरक्षण अभियान” या अंतर्गत शेतमाल तारण योजनेची शेतकऱ्यांना माहिती मिळावी याकरिता दि.25 नोव्हेबर 2021 रोजी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ,गडचिरोली. या वखार केंद्रावर करण्यात आले .कार्यशाळेत साठा अधीक्षक ,श्री ए.शा.,माडेमवार यांचे द्वारे वखार महामंडळ मधील शेतकऱ्यांच्या हिताचे, योजनांचे उलघडा करत शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारे वखार महामंडळ द्वारे फायदा होऊ शकतो.जसेकी,वखारी मधील मालाची साठवणूक,वखार पावती, शास्त्र शुद्ध पद्धतीचा साठवनूकीस असलेला मालाला फवारणी, साठवनुकीस असलेल्या मालावर तारण कशा प्रकारे प्राप्त करता येऊ शकतो , शेतकऱ्यांचा पिक- पेरे पत्रकावर 50% वखार भाडे या मध्ये सुट शेतकऱ्यांना दिली जाते तसेच शेत मालाचे 100% विमा संरक्षण वखार महामंडळाचा वतीने शेतकऱ्यांना दिला जातो. या सर्व बाबींचा समावेश करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच उपस्थित जिल्हा कृषी अधीक्षक, श्री.बसवराज मस्तोळी, यांचे द्वारे , शेतमाल किमान आधारभूत किंमत, शेतमालाचे मागणी व पुरवठा विषयावर प्रकाश टाकत शेतमालाचे आवक, जावक वखार महामंडळ यांचे द्वारे शेतमाल तारण कर्जाकरिता कुठलेही जास्त कागदपत्र न घेता शेतमालावर तारण मिळून देत असते. करिता, शेतकरी बांधवाना शेतमाल वखारी मध्ये साठवणूक करून गरजेपोटी तारण योजनेचा फायदा घ्यावा व वाजवी दरापेक्षा जास्त दर शेतमाला आल्या नंतरच विकावे असे आवाहन केले . तसेच वखारी मधील साठवणुकीचे विश्लेषण करत , शेतकऱ्यांना कशाप्रकारे शेतमाल साठवणूक करून त्याचे फायदे कशा प्रकारे घेता येऊ शकते ह्याबाबत त्यांचेद्वारे शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांना मार्गदर्शन करण्यात आले.
वखार महामंडळाने महाराष्ट्र सहकारी बँकेच्या सहकार्याने ब्लोक चैन द्वारे अभिवन शेतमाल तारण योजनेद्वारे शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी याकरीता तारण ची सुविधा उपलब्द करून देण्यात आले आहे. ह्या मध्ये कुठलेही जास्त हेलपाटे न मारता थेट शेतकऱ्यांना साठवनुकीस असलेल्या मालाचा किमतीच्या 70% कर्ज 9% द.सा.द.से.दराने उपलब्द करून दिले जाते तसेच शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत व शेतकरी उत्पादक कंपनी ह्यांना 75 लाख पर्यंत कर्ज 24 तासामध्ये त्यांच्या खात्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे RTGS द्वारे वर्ग करण्यात येते. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा. असे वरिष्ठ सल्लागार ,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ,पुणे. भाऊसाहेब तेमगर यांचे द्वारे आवाहन करण्यात आले .
सदर कार्यशाळेत कृ. ऊ.बाजार समिती,गडचिरोली मुख्य प्रशासक प्रभाकर वासेकर, कृ.ऊ.बाजार समिती,गडचिरोली, सचिव नरेंद्र राखडे, उप.विभागीय कृषी अधिकारी,वडसा, निलेश गेडाम, उपविभागीय कृषी अधिकारी,गडचिरोली. प्रदीप वहाने, श्री.योगाजी बनपुरकर ( झाडीपट्टी ,FPC.) तसेच श्रीमती.मीना गरगम(पर्लकोटा FPC. अहेरी.) स.बा. बिसेन ( चतुर्थ श्रेणी कर्मचारी ,MSWC,गडचिरोली.) वखार केंद्रावरील कंत्राटी कर्मचारी अंकुश उईके व वनपाल कुमरे तसेच उपस्थित सर्व शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी वर्ग ह्यांच्या सहयोगाने सदर कार्यशाळा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, गडचिरोली.येथे पार पडली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साठा अधीक्षक ए.शा.माडेमवार , गडचिरोली. यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा