नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
गडचिरोली, दि.26: राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दि. 17 नोव्हेंबर 2021 अन्वये निधन, राजीनामा, अनर्हता, किंवा इतर कारणामुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या ग्रामपंचायत आवलमरी (प्रभाग -3), राजाराम (प्रभाग -1,2,3), पेठा (प्रभाग-1,2), मरपल्ली (प्रभाग-1,2), मेडपल्ली (प्रभाग-3), रेपनपल्ली (प्रभाग-5), खमनचेरु ( प्रभाग-2,4), देवलमरी (प्रभाग-3), किष्टापुर वेल ( प्रभाग-1), कमलापुर (प्रभाग-2), पल्ले (प्रभाग-1,3), येडमपल्ली (प्रभाग-1), किष्टापुर दौड (प्रभाग-1), व वट्रा खुर्द (प्रभाग-2), येथील रिक्त सदस्य पदाच्या पोटनिवडणूकांकरीता पारंपारिक पद्धतीने निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.
तहसिलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी कार्यालय, अहेरी यांचे दिनांक 22 नोव्हेंबर 2021 मधील मुद्दा क्र.3 मध्ये सुधारणा असून राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशनानुसार सन 2020 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 4, दि. 11 मार्च 2020 अन्वये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमी देण्याचा मुभा संपुष्टात असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सन 1959 चा अधिनियम क्र.3 च्या कलम 10-अ मधील तरतुदीनुसार नामनिर्देशनपत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. असे तहसिलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी, अहेरी यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा