प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण करिता घरकुल लाभार्थी निवड व ग्रामसभांची प्रक्रिया सुरू.

गडचिरोली, दि.25: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण  या 2021-22 करिता घरकुल  मंजूर करण्याकरीता लाभार्थी निवड व ग्रामसभाची प्रक्रिया सुरू   झालेली आहे. आवास प्लस सर्वेक्षण (प्रपत्र ड मधील माहितीच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीणची  प्राधान्यक्रम यादी तयार करण्याबाबत शासनाचे दि.30/08/2021 चे पत्रानुसार त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आवास प्लस सर्वेक्षणची माहिती वापरून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण करीता लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम यादया तयार करावयाचे आहे.

प्राधान्यक्रम यादी अंतिम करण्याची प्रक्रिया :- आवास प्लस डेटाबेस मधील कुटुंबांची प्रत्यक्ष पाहणी करून अपात्र कुटुंबे वगळण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी (पंचायत समिती स्तरावरून समिती गठीत करून कार्यवाही करणे) (Removal Of Ineligible Beneficiaries). तालुकास्तरावरून अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना आवास सॉफट प्रणालीवर जिल्हास्तरावरून मान्यता देणे. ज्या ग्रामपंचायती मध्ये अपात्र लाभार्थी वगळण्याची प्रक्रिया (Removal Process) पूर्ण झाली आहेअशा ग्रामपंचायतीला आवास सॉफट प्रणालीवर जिल्हास्तरावरून मार्क करणे.

    ज्या ग्रामपंचायतीमध्ये जॉब कार्ड मॅपींग 100 टक्के पूर्णझाले आहेफक्त अशाच ग्रामपंचायतीच्या प्राधान्यक्रम यादया आवास साफट प्रणालीवर उपलब्ध होतील, ग्रामपंचायत निहाय प्रधान्यक्रम यादया ग्रामसभे मध्ये ठेवण्यासाठी डाउुनलोड करण्यात येतील, भविष्यात Download करण्यात आलेल्या System Generated PriorityList यादीवर कोणत्याही प्रकारचा अक्षेप येवू नये यासाठी Download केलेल्या यादयांना व्यापक प्रसिध्दी दयावी, (ग्रामपंचायतीच्या दर्शनिय भागावर यादया लावणेइलेक्ट्रानिक मिडीयाचा वापरदवंडी इत्यादी)तसेच सर्व ग्रामसभेच्या सभासदा पर्यंत सदर यादी पोहचेलअशी दक्षता सरपंच  सचिव यांनी घ्यावी.

वरील सर्व यादया ग्रामसभेत किंवा आवश्यक असल्यास विशेष ग्रामसभेत ठेवाव्यातइतर संवर्गाच्या यादीमधील अल्पसंख्यांक लाभार्थी वेगळे करणेग्रामसभेमध्ये ठेवलेल्या यादीची अ,,क अशा यादया तयार करण्यात येतीलग्रामसभा ठराव व अधिकाऱ्यांचे पडताळणी अहवाल आवास सॉफट प्रणालीवर अपलोड केल्या जातीलतालुकास्तरावर आवास सॉफट प्रणालीवर ग्रामसभेचे अंतिम केलेली प्रधान्यक्रम यादी (प्रपत्र ब) ची नोंदणी करण्यात येईलअंतिम केलेल्या प्राधान्यक्रम यादीला जिल्हास्तरावरून Appellate Committee ची मान्यता मिळाल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत मंजूरीसाठी पात्र होईल.

वरीलप्रमाणे अ,,क विषयावरील ग्रामसभेच्या ठरावाव्दारे मंजूर झालेल्या यादयांना ग्रामसभा झालेल्या तारखेपासून दिवस प्रसिध्दी द्यावी. यादी प्रसिध्द केल्यानंतर विषय अ,,क च्या यादी संदर्भातील प्रधान्यक्रम बदलवगळणे इत्यादी संदर्भात हरकती असल्यास संबंधित कुटुंबांची यादी प्रसिध्दीची मुदत संपल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाचे आत संबंधित तालुकाच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करू शकतील. असे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.