गडचिरोली जिल्हयातील 9 नगर पंचायतीमध्ये आदर्श आचार संहिता लागू.

गडचिरोलीदि.26:  राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये गडचिरोली जिल्हयातील मुदत समाप्त झालेल्या  नगरपंचायती मधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2021 परिशिष्ट-1 प्रमाणे जाहीर करण्यात आला आहे.

त्यात गडचिरोली जिल्हयातील 9 नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुक नगर पंचायत, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, मुलेचरा, धानोरा, कुरखेडा, व कोरची येथे आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या संदर्भीय आदेशातील परिशिष्ट-1 मधील टप्यानुसार नगरपंचायतींचे सार्वत्रिक निवडणूकीचा शेवटचा टप्पा मतमोजणी दिनांक 22 डिसेंबर, 2021 ( बुधवार) रोजी पार पाडण्यात येणार असून उक्त आदेशाच्या परिच्छेद 7 नुसार निवडणूकीची आचारसंहिता आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 24 नोव्हेंबर,2021 पासून ते निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यत अंमलात राहणार आहे.

आचार संहिता ही सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संपूर्ण संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लागू  राहणार असून क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्रसुध्दा करता येणार नाही. असे निर्देशित केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.