महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल तालुक्यातील पाणंद रस्त्याची केली प्रत्यक्ष पाहणी.

कामाच्या गुणवत्तेत तडजोड नाही.

नागपूर,दि. 30 :  शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादने वेळेत बाजारपेठेपर्यंत पोहचविता यावीत यासाठी त्यांच्या शेतापासून रस्त्याची नितांत आवश्यकता प्रत्येक भागात असते. शेतकऱ्यांची ही अडचण दूर व्हावी याउद्देशाने या योजनेअंतर्गत आपण जिल्ह्यात सर्व तेरा तालुक्यात एकूण 649 कामांना मंजूरी दिली असून यापैकी 491 कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. जी कामे हाती घेतली आहेत ती  गुणवत्तेची निकष लक्षात घेऊन पूर्ण करावीत, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

काटोल तालुक्यातील नायगाव ते खाणगाव या एक किलोमीटर पाणंद रस्त्याची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: पाहणी केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान कच्चा रस्ता देण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले असल्याचे सांगितले. यात शेतकरी कोणताही वाद न आणता स्वत: पुढे येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत भिवापूर तालुक्यात 30, हिंगणा तालुक्यात 31, कळमेश्वर तालुक्यात 27, कामठी तालुक्यात 55, काटोल तालुक्यात 58, कुही तालुक्यात 73, मौदा तालुक्यात 77, नागपूर तालुक्यात 43, नरखेड तालुक्यात 57, पारशिवनी तालुक्यात 23, रामटेक तालुक्यात 32, सावनेर तालुक्यात 92, उमरेड तालुक्यात 51 अशी जिल्ह्यात एकूण 649 पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.