पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आदिवासींसाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे निर्देश

इमेज
गडचिरोली, दि.26:                                    आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हितासाठी   राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे  आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज यंत्रणेला दिले.  एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, अहेरी येथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री उईके बोलत होते.     याबैठकीला आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, प्रकल्प अधिकारी कुशल जैन (अहेरी), रणजित यादव (गडचिरोली) व नमन गोयल (भामरागड), आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दिगंबर चव्हाण, आदिवासी विकास मंडळाचे महाव्यवस्थापक किरण गाडे यांच्यासह अंबरीश आत्राम, प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम व डॉ. नामदेव उसेंडी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री उईके यांनी ठक्कर बाबा योजना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, घरकुल योजना, दुधाळ जनावर वाटप योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, पीएम जनमन य...

राज्यातील शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू

इमेज
           महाराष्ट्रात पहिलीपासू इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची       सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित नव्या धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. तर पुढील वर्षी दुसरी, तिसरी, चौथी, सहावीसाठी नवे शिक्षण धोरण लागू करण्यात येईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासून अंमलबजावणी होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील. तसेच नव्या शैक्षणिक धोरणानुसार यापुढे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्वमाध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरले जातील. नव्या शैक्षणिक धोरणानुसार वय 3 ते 8 वर्षापर्यंत बालवाटिका म्हणजे 1,2,3 तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीचा पायाभूत स्तरामध्ये समावेश असेल. त्यानंतर वय 8 ते 11 म्हणजे इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी यांचा पूर्वतयारी स्तरामध...

लाडकी बहीण योजना महिलांना मिळणार आता 1500 रुपये ऐवजी 500 रुपये,यादी जाहीर

इमेज
  aditi tatkare ladaki bahin 500 महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर, राज्य सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळाल्यास ही रक्कम 2100 रुपये केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. सध्या राज्यातील महिला 2100 रुपये कधी मिळतील याची प्रतीक्षा करत असतानाच, लाडकी बहीण योजनेतील सुमारे 8 लाख महिलांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे.  महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. या बदलामुळे सुमारे 8 लाख लाभार्थी महिलांना आर्थिक फटका बसणार आहे, कारण या सुधारणेनुसार या महिलांचे मासिक मानधन कमी करण्यात आले आहे. यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, विरोधी पक्षांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना यापूर्वीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे. राज्यातील अशा...