जागतिक हिवताप दिन साजरा.
गडचिरोली,दि.25 : दर वर्षी 25 एप्रिल हा दिवस "जागतिक हिवताप दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. हिवताप नियंत्रण तसेच निर्मूलनासाठी निरंतर प्रयत्न आणि वचनबद्धता याची आठवण करून देण्यासाठी हा दिवस पाळला जातो."मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी"ही यावर्षीचीमुख्य संकल्पना आहे. जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून गडचिरोली शहरातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभातफेरी ची सुरुवात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे व राज्य किटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. प्रभातफेरी द्वारे हिवताप आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यात जिल्हा सामान्य रुग्णालय येथील परिचर्या प्रशिक्षणार्थी, आशा स्वयंसेविका, सर्वअधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्या हिवताप विषयक घोषवाक्याच्या निनादात हि प्रभातफेरी मुख्य मार्गाने फिरवून महिला व बाल रुग्णालयात विसर्जित करण्यात आली.जिल्हा हिवताप कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्...