पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सात रेती घाट लिलावाची मंजुरी अंतिम टप्प्यात, रेती घाटांना पर्यावरण विषयक अनूमतीसाठी १९ जून रोजी जनसुनावणी, पुरामुळे रेतीग्रस्त शेतीच्या सर्वेक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार, घरकुलांसाठी ८० हजार झिरो रॉयल्टी पास .

गडचिरोली,दि.21 : निवडणूक आचारसंहितेमुळे थांबलेले सात रेती घाट लिलाव मंजुरीचे प्रस्ताव आता निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने अंतिम करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिली आहे.गडचिरोली जिल्हयात एकूण ४९ रेतीघाट असून त्यापैकी ३६ रेतीघाटांवरील १३ वाळू डेपो मंजूर करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये पहिल्या व दुस-या फेरी दरम्यान एकूण ७ वाळू डेपोकरीता निविदा प्राप्त झाल्या होत्या. मात्र, निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून करारनाम्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले होते. याबाबत आता निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन प्राप्त झाले असून देऊळगाव, कुरुड, दूधमाळा, आंबेशिवणी, वाघोली, गणपूर, गडअहेरी-बामणी, या ७ रेती डेपोकरीता करार अंतीम करण्यात येत आहेत. रेतीघाटांना पर्यावरण विषयक अनूमतीसाठी १९ जून रोजी जनसुनावणी रेती घाट लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही प्रत्यक्ष रीतीच्या उत्खननासाठी पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी आवश्यक असते. जिल्हयातील ४९ रेती घाटांपैकी वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध असलेल्या ३३ रेतीघाटांना पुढील ३ वर्षासाठी पर्यावरण अनुमती प्राप्त करुन ...