शिवसेना एटापल्ली कडून गरीब परिवाराला आर्थिक मदत.

एटापल्ली :- आज दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी पंदेवाही गावातील श्री. नामदेव दासरवार यांचा २७ ऑगस्ट २०२२ रोजी दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. घरचा प्रमुख गेल्यामुळे त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले. घरची परिस्थिती हालाक्याची असल्यामुळे त्यांना शिवसेना तालुकाप्रमुख मनीष भाऊ दुर्गे व युवासेना तालुकाप्रमुख अक्षय भाऊ पुंगाटी तसेच नगरसेवक नगरपंचायत एटापल्ली नामदेव भाऊ हिचामी यांच्याकडून ५०००/- रुपये रोख रक्कम व दवाखान्यातील १०,०००/- रुपये बिल अदा करून त्यांना आर्थिक मदत करण्यात आले. हे कोसळलेले दुःख बघून त्या दोन मुलांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना एटापल्ली च्या वतीने करण्यात येणार आहे असे आश्वासन तालुकाप्रमुख मनीष भाऊ दुर्गे व युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय भाऊ पुंगाटी कडून देण्यात आले.