पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोलीस स्टेशन, अहेरी येथील पोलीसांची बंदुकीच्या जोरावर गुंडागिरी.

इमेज
काहीही कारण नसतांना पोलीसांकडून युवकाला जबर मारहाण. अहेरी:- तालुक्यातील अहेरी- कन्नेपल्ली मार्गावर दि- ०५.०७.२०२२ रात्री १२.३० वाजता अहेरी पोलीसांकडून जबर मारहाण आणि बंदुकीच्या जोरावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याची लेखी तक्रार अहेरी येथील युवकाने अपर पोलीस अधीक्षक, अहेरी व उपविभागीय अधिकारी, अहेरी यांना केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, रोहन अनिल शुध्दलवार, रा. अहेरी हा तरुण कन्नेपल्ली येथील शेती कामावर जावून येतांना मौजा अहेरी येथील पॉवर हाऊस कॉलनी मधील साई मंदिराजवळ दोन पोलीस शिपाई रात्रीच्या गस्तीवर होते. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या दोन शिपाई पोलीसाने सदर युवकास अडवुन कुठे जावून येत आहे असे विचारले असता त्याने सांगितले की, मी कन्नेपल्लीला शेती कामाकरीता जावून येत आहे आणि आता मी माझा मित्र जिवन मंत्रीवार यांच्या घरी जात आहे. युवकावर शंका आल्याने पोलीस शिपाई यांनी जीवन मंत्रीवार याला मौक्यावर बोलवायला सांगितले. तेव्हा रोहन आपला मित्र जीवन मंत्रीवारला फोन करून बोलविले असता जीवन साई मंदीर येथे काही वेळात पोहचला. मौक्यावर येऊन...