पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल तालुक्यातील पाणंद रस्त्याची केली प्रत्यक्ष पाहणी.

इमेज
कामाच्या गुणवत्तेत तडजोड नाही. नागपूर,दि. 30 :  शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादने वेळेत बाजारपेठेपर्यंत पोहचविता यावीत यासाठी त्यांच्या शेतापासून रस्त्याची नितांत आवश्यकता प्रत्येक भागात असते. शेतकऱ्यांची ही अडचण दूर व्हावी याउद्देशाने या योजनेअंतर्गत आपण जिल्ह्यात सर्व तेरा तालुक्यात एकूण 649 कामांना मंजूरी दिली असून यापैकी 491 कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. जी कामे हाती घेतली आहेत ती  गुणवत्तेची निकष लक्षात घेऊन पूर्ण करावीत, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. काटोल तालुक्यातील नायगाव ते खाणगाव या एक किलोमीटर पाणंद रस्त्याची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: पाहणी केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान कच्चा रस्ता देण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले असल्याचे सांगितले. यात शेतकरी कोणताही वाद न आणता स्वत: पुढे येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  जिल्ह्यात या योजनेअंतर्गत भिवापूर तालुक्यात 30, हिंगणा तालुक्यात 31, कळमेश्वर तालुक्यात 27, कामठी तालुक्यात 55, काटोल तालुक्यात 58, कुही तालुक्यात 73, मौदा ...

शहरात प्रस्तावित विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी

इमेज
   –                     गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज शहरातील विविध ठिकाणी जागेची पाहणी केली. यामध्ये नुकतेच अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेले प्रेक्षागृह तसेच मामा तलावाचे सौंदर्यीकरण व केंद्रीय विद्यालयासाठी जागेचा आढावा यांचा समावेश होता. पाहणी दौऱ्यात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, तहसीलदार संतोष आष्टीकर, तसेच बांधकाम विभागाचे अभियंता अंकुश भालेराव उपस्थित होते. त्यांनी संबंधित प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती दिली. प्रेक्षागृह जिल्ह्यात ७५० आसनक्षमतेच्या प्रेक्षागृहाच्या उभारणीसाठी अर्थसंकल्पात २७.५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शालेय विद्यार्थी, रंगकर्मी आणि झाडीपट्टी कलाकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या महत्वपूर्ण बाबींसाठी संकुल परिसरात नाट्यगृह उभारण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी करण्यात आली. मामा तलावाचे सौंदर्यीकरण शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी महत्त्वाच्या म...

महाराष्ट्र दिनी आशा स्वयंसेविकांचा सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरव दुर्गम भागासाठी पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण

इमेज
                  गडचिरोली येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस मुख्यालय येथे ध्वजवंदन कार्यक्रमात आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेंचा सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच दुर्गम भागासाठी पाच अत्याधुनिक रुग्णवाहिकेंचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी संगीता सोनल भैसा गाव विहिटेकला प्रा आ केंद्र बोटेकसा तालुका कोरची, नंदा घनश्याम नैताम गाव. जिवनगठ्ठा प्रा केंद्र तोडसा ता एटापल्ली, वैजंता बिलास उसेंडी गाव- झरी प्रा आ केंद्र करावफा तालुका धानोरा, राजुबाई दुर्गय्या पुल्लू्रवार प्रा आ केंद्र महागाव ता अहेरी,मीरा वंजा कुड्यामी प्रा केंद्र आरेवाडा तालुका भामरागड या दुर्गम भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशांना गौरविण्यात आले व त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ प्रफुल्ल हुलके, डॉ सुनील मडावी,सहायक जिल्हा आरोग्...